श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहरातील बस्थानकासमोरील हॉटेल सोनिया बार & परमिट रूम हे दुकाना समोरील भागात सोनिया बार. शॉपी या नावाने बॅनर ( बोर्ड ) लावून गि-हाईकांची दिशाभूल करीत आहे या बाबत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग किनवट येथील दुय्यम निरीक्षक रामप्रसाद पवार यांना काही जागरूक नागरीकांनी संपर्क करून जीपीएस मॅप फोटो दिले पंरतु पवार हे गांधारीच्या भुमिकेत असल्याने नागरीकात उलट सूलट चर्चा होत आहे .
शहरातील वर्दळी च्या ठिकाणी असलेली हॉटेल सोनिया बार & परमिट रूम हे दुकाना समोरील भागात सोनिया बार .शॉपी या नावाने बॅनर ( बोर्ड ) लावले आहे, सदरील गि-हाईक बार मध्ये जाऊन दारु बॉटल खरेदी केल्यास त्यास बार & परमिट रुमच्या दरात बॉटल देतात छापील दर ४०० परंतु ते ५०० रू, घेतात व बार मध्ये दारु पिऊ देत नाहीत. तेथे बसण्याची, पाण्याची, टेबल खुर्ची, ग्लास.बाथरूम, हॉटेल ई. कोणतीही व्यवस्था नाही.
गि-हाईकांनी विचारले कूठे बसून पिऊ तर बार मालक म्हणतात बाहेर कूठेही जाऊन पिया हि शॉपी आहे. याबाबत किनवट येथील दुय्यम निरीक्षक रामप्रसाद पवार यांना पुराव्या सह माहीती दिली असता ते कोणतीही दखल घेत नाहीत,याबाबत राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक नांदेड गणेश पाटिल.यांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.