Nationalist Congress Party | राष्ट्रवादी शहर सहसचिवपदी सपना जोंधळे -NNL

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर सहसचिवपदी इतवारा भागातील सपना जोंधळे निवड करण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी सुरू आहे. प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची कार्यकारिणी आखणी कार्यक्रम सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्या नेतृत्वात शहरामध्ये प्रभागनिहाय कार्यकत्यांच्या बैठका सुरू आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय, वार्डनिहाय व्युहरचना केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरात विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी येण्यासाठी इच्छुक आहेत.

त्या अनुषंगाने पक्ष बळकटीसाठी जीवन घोगरे पाटील हे प्रयत्न करत आहेत. जुन्या नांदेड इतवारा भागातील महिला कार्यकर्त्या सपना जोंधळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर सहसचिवपदी निवड करण्यात आली. दरम्यान याचवेळी युवक कार्यकर्ते श्रीप्रसाद गुरूपवार यांनाही रोजगार, स्वयंरोजगार सेलच्या दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

स्मिता गुज्जरवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नवीन पदाधिकारी व पक्ष प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांना जीवन घोगरे पाटील यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शांतीलाल जैन, प्रविण घुले, मयूर कोकरे, संदीप नवघडे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button