क्राईमनांदेड

The march hit Hadgaon tehsil office : स्वराज्य संघटनेचा बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला -NNL

नांदेड| आज स्वराज्य संघटनेचे माधवराव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात हदगाव हिमायतनगर मतदार संघात शेतकरी बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि हजारो शेतकरी आणि बैलगाड्या या मोर्चात उपस्थित होत्या.

तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सात प्रमुख मागण्या मांडल्या: 100% नुकसान भरपाई: सर्व शेतकऱ्यांना पंचनामागृह करून 100% नुकसान भरपाई मिळावी. नदीकाठावरील शेतकऱ्यांचे नुकसान: नदीकाठावरील शेतकऱ्यांना सामग्री अनुदान व विशेष पॅकेज जाहीर करावे. पीक विमा: 2022-23 व 2023-24 साठी सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा. घरांची पडझड: घराची पडझड झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत व घरकुले मिळावीत. कर्जमाफी: सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी. नदी खोलीकरण: नदी खोलीकरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जावा. अनुदान: 2022-23 चे रखडलेले अनुदान तात्काळ मिळावे.

IMG 20240918 WA0036 The march hit Hadgaon tehsil office : स्वराज्य संघटनेचा बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला -NNL

या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्वराज्य पक्षाचे तिरुपती पाटील भगनुरे, सदा पाटील पुयड, गजानन पाटील सोळंके, बालाजी पाटील कराळे, पवन पाटील मोरे, देवा पाटील भानेगावकर, दिघा पाटील जाधव हरडफकर, अमोल पाटील मारलेगावकर, अवधूत पाटील पवार एकंबेकर, कृष्णा पाटील हडपकर, बालाजी पाटील ढोणे, अमोल पाटील वानखेडे, माधव वानखेडे, आकाश गोधले, सुरेश हडपकर, शिवराज वारकड, गजानन कोल्हे, शिवकांत सूर्यवंशी, अवधूत वानखेडे, निरंजन पाटील कदम, शिवा पाटील शिंदे, योगेश पाटील बोरगावकर, अमोल पाटील वानखेडे, ऋतिक पाटील कोठेकर यांच्यासह शेकडो मावळे या आंदोलनात सहभागी झाले होते.

IMG 20240918 WA0040 The march hit Hadgaon tehsil office : स्वराज्य संघटनेचा बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला -NNL

मोर्चाच्या समारोप प्रसंगी, शेतकऱ्यांनी सोयाबीन नाश झालेल्या खराब सोयाबीनचा गुच्छ तयार करून आल्यास सन्माननीय एचडीएम आणि तहसीलदारांना देऊन त्यांचा सत्कार केला. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल आणि त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे.

IMG 20240918 WA0034 The march hit Hadgaon tehsil office : स्वराज्य संघटनेचा बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला -NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!