हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्प पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंत कदम सर होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की. 6 डिसेंबर 1956 याच दिवशी आपण दिन दलितांचा कैवारी, मानवतावादी महामानवाला आपण गमावलो एवढेच नाही तर या देशाच्या समाजकारणात, राजकारणात, अर्थकारणात मौलिक योगदान देणारे महापुरुष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्याने आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान झाले.
भारत देशाच्या उभारणीमध्ये आणि जडणघडणीमध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता, असेही ते म्हणाले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी.सी देशमुख सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रोफेसर डॉ. एल.बी .डोंगरे सर यांनी मांडले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.