नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत या वर्षी जय व्येकंटेश महालक्ष्मी गणेश मंडळ पॉवरलूम व जय महाराष्ट्र गणेश बळीरामपूर चा देखावा उत्कृष्ट ठरला असून अनेक ठिकाणी या मंडळाने सादरीकरण करून भाविक भक्तांची मने जिंकली.
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जयव्यंकटेश महालक्ष्मी गणेश मंडळाचे अध्यक्ष विशाल तोगलवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली याही वर्षी श्रीकृष्ण अन सुदामा यांचा जीवंत देखावा सादर करण्यात आला यामध्ये चंद्रकांत म्यानेटवार,संतोष जिंदम ,प्रकाश तोगलवार,नारायण अलसटवार ,नरसिंग झुंझुरवार ,शंकर दासेवार ,गजानंद सिरसुलवार, विशाल तोगलवार,गजानंद कोकुलवार ,
संजय अलसटवार ,शंकर गोन्टलवार यांनी जय महाराष्ट्र गणेश मंडळ बळीरामपूरचे अध्यक्ष संतोष अलसटवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रावण अहंकार हरण यांचा देखावा कलाकार सुनिल सोळंके, रघु म्यानेवार,मंगेश लोकमन्नवार, ओम बोटलवार, मारोती कदम, मुकेश लोकमनवार, ओम बोटलवार, अविनाश श्रीमेवार, वैभव म्यानेवार यांनी भुमिका साकारली होती.
सिडको हडको परिसरातील अनेक भागात सादरीकरण केलेल्या या देखाव्याला अनेक ठिकाणी ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळाला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत कलाकारांना प्रोत्साहन दिले तर छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको येथे मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या वतीने रोख रक्कम देऊन सन्मान केला तर अनेक ठिकाणी सादरीकरण कलाकाराचे स्वागत करण्यात आले, या दोन सजिव देखावा सादरीकरण मुळे मुख्य मिरवणुकी मुळे श्री विसर्जन मिरवणुकीत ऊत्साह दिसून आला.