नांदेड| आज स्वराज्य संघटनेचे माधवराव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात हदगाव हिमायतनगर मतदार संघात शेतकरी बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि हजारो शेतकरी आणि बैलगाड्या या मोर्चात उपस्थित होत्या.


तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सात प्रमुख मागण्या मांडल्या: 100% नुकसान भरपाई: सर्व शेतकऱ्यांना पंचनामागृह करून 100% नुकसान भरपाई मिळावी. नदीकाठावरील शेतकऱ्यांचे नुकसान: नदीकाठावरील शेतकऱ्यांना सामग्री अनुदान व विशेष पॅकेज जाहीर करावे. पीक विमा: 2022-23 व 2023-24 साठी सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा. घरांची पडझड: घराची पडझड झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत व घरकुले मिळावीत. कर्जमाफी: सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी. नदी खोलीकरण: नदी खोलीकरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जावा. अनुदान: 2022-23 चे रखडलेले अनुदान तात्काळ मिळावे.


या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्वराज्य पक्षाचे तिरुपती पाटील भगनुरे, सदा पाटील पुयड, गजानन पाटील सोळंके, बालाजी पाटील कराळे, पवन पाटील मोरे, देवा पाटील भानेगावकर, दिघा पाटील जाधव हरडफकर, अमोल पाटील मारलेगावकर, अवधूत पाटील पवार एकंबेकर, कृष्णा पाटील हडपकर, बालाजी पाटील ढोणे, अमोल पाटील वानखेडे, माधव वानखेडे, आकाश गोधले, सुरेश हडपकर, शिवराज वारकड, गजानन कोल्हे, शिवकांत सूर्यवंशी, अवधूत वानखेडे, निरंजन पाटील कदम, शिवा पाटील शिंदे, योगेश पाटील बोरगावकर, अमोल पाटील वानखेडे, ऋतिक पाटील कोठेकर यांच्यासह शेकडो मावळे या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोर्चाच्या समारोप प्रसंगी, शेतकऱ्यांनी सोयाबीन नाश झालेल्या खराब सोयाबीनचा गुच्छ तयार करून आल्यास सन्माननीय एचडीएम आणि तहसीलदारांना देऊन त्यांचा सत्कार केला. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल आणि त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे.
