Dr. Hansraj Vaidya ; महाराष्ट्राच्या “शिंदे-फडणवीस-पवार” या लाडक्या सरकारकडून नांदेड भेटीत “मुख्यमंत्री ज्येष्ठ माय-बाप योजना”ची घोषणा अपेक्षित..! -डाॅ.हंसराज वैद्य – NNL

नांदेड| महाराष्ट्र राज्याचे अत्यंत संवेदनशिल,गोर गरिब माय-बाप जनतेचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्रीजी तथा दोन्ही उप मुख्यमंत्रीजी नांदेड या पावन नगरित उद्याला येत आहेत ही नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एकूनच लाडक्या बहीणी तथा ज्येष्ठ माय- बापांसाठी एक अनमोल संधीच तथा पर्वणीच म्हणावी लागेल..!

सद्याचे मा.ना.एकनाथरावजी शिंदेसाहेब तथा महाराष्ट्राचा एक”नाथ”,देवादि देव “देवेंद्र” आणि अजिंक्य असा “अजित” अर्थात “एकनाथजी-देवेंद्रजी-अजितजी” मंत्री मंडळाचे प्रमुख हे गरजवंत रयतेसाठी अनेक लोकोपयोगी व लोकप्रिय योजना घेऊन कार्यान्वित करण्यास्तव येत आहेत.

राष्ट्रनिर्मितीत सिंहाचा वाटा असलेल्या,देशाचे शिल्पकार तथा राष्ट्रीय संपत्ती असलेल्या पण वृद्धाप काळाने व अनेक आजारांची शिकार बणलेल्या, गरिब गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित, निराधार,विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना “मुख्यमंत्री ज्येष्ठ लाडके माय-बाप योजना” आम्हा ज्येष्ठांसाठी खास तथा विशेष योजना कार्यान्वित करावी व लाडकी बहिण सक्षमिकरण आनंद सोहळ्या प्रमाणे “मुख्यमंत्री ज्येष्ठ लाडके माय-बाप योजना” आनंद मेळाव्याची तथा सोहळ्याची, आचार संहिता लागण्या पूर्विच घोषणा नांदेड दौर्‍यात तथा भेटीत करावी व आम्हा ज्येष्ठ नागरिकांची अर्थिक दुर्बलता घालवून 3500/- मानधन प्रतिमहा देऊन सबलीकरण करावे एवढीच आमची माफक मागणी “शिंदे-फडणवीस-पवार” शासनाने मान्य करून घोषित करावी.भविष्यात ज्येष्ठांकरवी काढण्यात येणार्‍या “शासनाच्या विजयाची व अभिनंदन पदयात्रा तथा आनंद मेळावा घेण्याची संधी आम्हा ज्येष्ठ माय-बापाना द्यावी हिच अपेक्षा!.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button