Dr. Hansraj Vaidya ; महाराष्ट्राच्या “शिंदे-फडणवीस-पवार” या लाडक्या सरकारकडून नांदेड भेटीत “मुख्यमंत्री ज्येष्ठ माय-बाप योजना”ची घोषणा अपेक्षित..! -डाॅ.हंसराज वैद्य – NNL
नांदेड| महाराष्ट्र राज्याचे अत्यंत संवेदनशिल,गोर गरिब माय-बाप जनतेचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्रीजी तथा दोन्ही उप मुख्यमंत्रीजी नांदेड या पावन नगरित उद्याला येत आहेत ही नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एकूनच लाडक्या बहीणी तथा ज्येष्ठ माय- बापांसाठी एक अनमोल संधीच तथा पर्वणीच म्हणावी लागेल..!
सद्याचे मा.ना.एकनाथरावजी शिंदेसाहेब तथा महाराष्ट्राचा एक"नाथ",देवादि देव "देवेंद्र" आणि अजिंक्य असा "अजित" अर्थात "एकनाथजी-देवेंद्रजी-अजितजी" मंत्री मंडळाचे प्रमुख हे गरजवंत रयतेसाठी अनेक लोकोपयोगी व लोकप्रिय योजना घेऊन कार्यान्वित करण्यास्तव येत आहेत.
राष्ट्रनिर्मितीत सिंहाचा वाटा असलेल्या,देशाचे शिल्पकार तथा राष्ट्रीय संपत्ती असलेल्या पण वृद्धाप काळाने व अनेक आजारांची शिकार बणलेल्या, गरिब गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित, निराधार,विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना "मुख्य...
