नांदेड। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव तत्वनिष्ठ, संघर्षशील, अभ्यासू, जीवनादायी,त्यागी नेतृत्व कॉ.सीताराम येचूरी यांचे दि.१२ सप्टेंबर रोजी दिल्लीत दुःखद निधन झाले.
कॉ.सीताराम येचूरी हे माजी खासदार आणि इंडिया आघाडीचे जेष्ठ नेते होते. त्यांच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर या आदिवासी व डोंगराळ तालुक्यात अनेक सभा झाल्या आहेत. नांदेड शहरात देखील त्यांच्या त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
त्यांच्या अकाली निधनाने डाव्या चळवलीत दुःख निर्माण झाले असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांना अभिवादन करण्यासाठी भाकप कार्यालय लाल बावटा, मिलगेट नांदेड येथे दुपारी २ वाजता आदरांजली सभेचे आयोजन डावी लोकशाही आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
या आदरांजली सभेच इंडिया आघाडीच्या व डाव्या लोकशाही आघाडीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन डाव्या आघाडीचे निमंत्रक कॉ.ऍड.प्रदीप नागापूरकर आणि माकप नांदेड तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले आहे.