नांदेड| महाराष्ट्र राज्याचे अत्यंत संवेदनशिल,गोर गरिब माय-बाप जनतेचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्रीजी तथा दोन्ही उप मुख्यमंत्रीजी नांदेड या पावन नगरित उद्याला येत आहेत ही नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एकूनच लाडक्या बहीणी तथा ज्येष्ठ माय- बापांसाठी एक अनमोल संधीच तथा पर्वणीच म्हणावी लागेल..!


सद्याचे मा.ना.एकनाथरावजी शिंदेसाहेब तथा महाराष्ट्राचा एक”नाथ”,देवादि देव “देवेंद्र” आणि अजिंक्य असा “अजित” अर्थात “एकनाथजी-देवेंद्रजी-अजितजी” मंत्री मंडळाचे प्रमुख हे गरजवंत रयतेसाठी अनेक लोकोपयोगी व लोकप्रिय योजना घेऊन कार्यान्वित करण्यास्तव येत आहेत.

राष्ट्रनिर्मितीत सिंहाचा वाटा असलेल्या,देशाचे शिल्पकार तथा राष्ट्रीय संपत्ती असलेल्या पण वृद्धाप काळाने व अनेक आजारांची शिकार बणलेल्या, गरिब गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित, निराधार,विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना “मुख्यमंत्री ज्येष्ठ लाडके माय-बाप योजना” आम्हा ज्येष्ठांसाठी खास तथा विशेष योजना कार्यान्वित करावी व लाडकी बहिण सक्षमिकरण आनंद सोहळ्या प्रमाणे “मुख्यमंत्री ज्येष्ठ लाडके माय-बाप योजना” आनंद मेळाव्याची तथा सोहळ्याची, आचार संहिता लागण्या पूर्विच घोषणा नांदेड दौर्यात तथा भेटीत करावी व आम्हा ज्येष्ठ नागरिकांची अर्थिक दुर्बलता घालवून 3500/- मानधन प्रतिमहा देऊन सबलीकरण करावे एवढीच आमची माफक मागणी “शिंदे-फडणवीस-पवार” शासनाने मान्य करून घोषित करावी.भविष्यात ज्येष्ठांकरवी काढण्यात येणार्या “शासनाच्या विजयाची व अभिनंदन पदयात्रा तथा आनंद मेळावा घेण्याची संधी आम्हा ज्येष्ठ माय-बापाना द्यावी हिच अपेक्षा!.
