Homeनांदेडसिडको मध्यवर्ती उदयानाची दुरवस्था, मनपा प्रशासनाकडून पाहणी, अंदाजे तिन कोटी रूपये तरतूद...

सिडको मध्यवर्ती उदयानाची दुरवस्था, मनपा प्रशासनाकडून पाहणी, अंदाजे तिन कोटी रूपये तरतूद -NNL

नवीन नांदेड। सिडको परिसरातील एकमेव असलेल्या मध्यवर्ती उदयाण गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असुन नागरीकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने पाहणी करून माहिती घेतली असल्याचे वृत्त असुन जवळपास सुशोभीकरण साठी तिन कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याचे वृत्त आहे.

नवीन नांदेड भागातील जेष्ठ नागरिक, युवक, महिला, बाल गोपाळसाठी असलेले एकमेव मध्यवर्ती उदयाण मनपा प्रशासनाने साकारून लाखो रुपये निधी खर्च करून वृक्ष, विधुत, खेळणी सह विविध साहित्य साकारले होते. एकमेव देखणे उधाण असतांना कालांतराने संरक्षक भिंत कोसळली व पडझड सुरू झाली आणि दुरावस्था होत गेली आणि खेळणी, वृक्ष, विधुत साहित्य रातोरात गायब झाले.

मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने नागरीकांना मात्र उधाण अभावी इतरत्र फेरफटका मारावा लागत आहे. या बाबत अनेक वृतमान पत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या, अखेर मनपाचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे [ez-toc][ez-toc]यांनी या बाबत उदयाण, बांधकाम,विधुत विभाग यांच्यासह इतर अधिकारी यांच्यी संयुक्त बैठक घेऊन पाहणी करण्याचे आदेशीत केले.

गेल्या विस दिवसापूर्वी मनपा कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, उदयाण विभागाचे डॉ. बेग,विधुत विभागचे सय्यद, कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून नव्याने संरक्षण भिंत, वृक्ष लागवड, विधुत दिवे, शौचालय, वॉचमन रूम, रंगरंगोटी, यासह अनेक कामाचा समावेश करण्यात आला असून जवळपास तिन कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याचे विश्वासनिय वृत्त असुन आयुक्त यांच्या कडे संचिका पाठवली असून मंजुरी मिळताच कामांना सुरूवात होणार असल्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त परिसरातील अनेक ठिकाणी दुरावस्थेत असलेले उदयाण ही लवकरच विकसित होणार असल्याचे समजते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments