Development works in Hadgaon : हदगाव शहरात ‘टक्का व्यवस्था’ मुळे विकासकामांची झाली वाताहत..!

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील नगरपरिषद कार्यक्षेत्रात होत असलेली व झालेली विकास कामं दिवसेंदिवस बिघडत चालली आहेत. ही कामं घाईगडबडीत आणि तथाकथित ‘टक्का पद्धती’ ने केली गेल्याने त्यांची गुणवत्ता गंभीर प्रश्न चिन्हाखाली आली आहे. राजकीय वरदहस्ताचा वापर करून काही प्रभावशालीनी आपल्या मनपसंत ठेकेदारांना कामं मिळवून दिली. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांत निकृष्ट रस्ते, सिमेट नाल्याची अपूर्ण स्थिती पाहायला मिळते. स्थानिक सजग नागरिकांनी या बोगस कामांची तक्रार थेट हदगाव विधानसभा क्षेत्राचे.आबाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे पुराव्यांसह मांडली. याची गंभीर दखल घेत आमदार कोहळीकर यांनी पण लगेच नगर…. परिषदेच्या प्रशासनाला निकृष्ट कामांचे देयक थांबवण्याचे आणि नव्याने दर्जेदार काम सुरू करण्याचे कडक निर्देश दिले.

त्या अंतर्गत सध्या नगरपरिषद प्रशासनाने काही मुख्य रस्त्यांच्या कामांबाबत संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावल्या असून, काही ठेकेदारांनी नव्याने काम सुरू केलं आहे. मात्र आता नव्यानेच त्याच रोडवर कामे सुरू करण्यात आली आहे हा प्रकार प्रशासन दृष्टीने चिंताजनक आहे. जेव्हा हे बोगस काम होत होते तेव्हा प्रशासन काय..? करत होते. या निमित्ताने प्रश्न आता निर्माण होत आहेत. विशेष बाब म्हणजे, बड्या राजकीय गटाशी संबंधित काही ठेकेदारांच्या नावे अनेकाना वेळो अलटून पालटून कामं दिली जात असून, ही बाब फार गंभीर आहे. ज्याच्याकडे ना पुरेसा अनुभव आहे… ना आवश्यक साधन सामग्री… परिणामी, काही महिन्यांतच रस्ते-नाल्या खराब होऊ लागल्या आहेत. आणि शासनाच्या निधीचा थेट अपव्यय होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

या सर्व कामांच्या ठिकाणी सध्या प्रशासकीय राज असल्यामुळे माहिती फलक बोर्ड लावले जात नाहीत. कोणतंही कामाचं नियोजन दिसून येत नाही. जिथे आवश्यक रोड नाली हवी तेथे टाकण्यात न येता कंत्राटदाराच कसा..? फायदा होईल हे पाहण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक नागरी सुविधा पासून वंचित आहे. जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की, हे काम मोठ्या नेत्याच्या निकटवर्ती याचं असल्यामुळे काही करू शकत नाही. त्यामुळे प्रशासनावर अप्रत्यक्ष दबाव टाकून बोगस कामांचे ही बील काढले गेल्याची चर्चा ऐकावायास मिळत आहे…..!

विद्यमान आमदारांनी आयोजित आढावा बैठक घ्यावी/ जनतेची मागणी..! हदगाव शहरा मधील काही जागरूक नागरिकांची मागणी आहे की, विद्यमान आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी या करिता सार्वजनिक आढावा बैठक बोलवावी. या बैठकीत नागरिक, स्थानिक माध्यमाचे प्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी यांची उपस्थिती असावी, जेणेकरून सर्व प्रश्न खुलेपणाने चर्चिले जाऊ शकतील.

कोहळीकरांचा ‘कडक’ पवित्रा – बोगस कामांना नाही माफी…!
नगर परिषद कार्यक्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, ठराविक लोक इतर ठेकेदारांच्या नावावर कामं मिळवून, अप्रत्यक्ष दबावाच्या आधारे बिलं काढत होते अशी माहीती आहे त्यांनी केलेल्या कामाचा दर्जा पाहता. हे लक्षात येत आमदार कोहळीकर यांनी विशेष लक्ष देत ठोस भूमिका घेतली. यामुळे सध्या तीन सिमेंट रस्त्यांच्या बोगस कामांबाबत नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.आमदार कोहळीकर यांनी केवळ कडक भूमिका न घेता, प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button