Pradeep Naik ; वृक्षारोपण सोबत संगोपनाची जबाबदारी आवश्यक :- प्रदीप नाईक – NNL

श्रीक्षेत्र माहूर/ राज ठाकूर | वृक्षारोपण करणे जेवढे गरजेचे आहे त्या पेक्षा लागवड करून झाडांचे संगोपन करणे तितकेच महत्वाचे आहे.वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले.

माहूर तालुक्यातील लखमापूर येथील पंचशील विद्यालयांमध्ये आज दिनांक 12 सोमवार रोजी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा तीहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदीप नाईक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव लखमापूरचे सरपंच गणेश राठोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल जाधव, विनोद राठोड,शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गायकवाड, डी.के.राठोड, ग्राम पंचायत सदस्य संतोष राठोड, दत्ता जाधव, गोविंद मगरे पाटील, मनोज कीर्तने, नम्रता किर्तने, यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.

लखमापूर येथील पंचशील विद्यालयात मोठ्या प्रमाणात परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती होत असून शाळेचे नाव ही लौकिक होत आहे .एका मागे एक दर वर्षी विद्यार्थी चांगल्या गुणांनी १० वी ची परीक्षा उत्तीर्ण होत आहे ही बाब लखमापूर ग्रामपंचायत साठी भुशावह असल्याचे मत संचालक निखिल जाधव यांनी व्यक्त केले.या वेळी विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button