Homeआरोग्यHealth Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य...

Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

किनवट | श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईंबाबा मंदिर सेवाभावी संस्था, किनवट यांच्या पुढाकारातून तसेच लायन्स नेत्र रुग्णालय, जंगमवाडी (नांदेड), ओम साई डॉ. धर्मकारे दंत दवाखाना व लायन्स स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईंबाबा मंदिर, किनवट येथे संपन्न होणार आहे.

या शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान व मार्गदर्शन, कान तपासणी (बहिरेपणा संदर्भात तपासणी व मार्गदर्शन), दंतविकार तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन,  आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रिया व पुढील उपचाराकरिता मोफत नोंदणी या सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

ग्रामीण भागातील गरजू रुग्ण, गरीब नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. “सेवाच खरा धर्म” या भावनेतून आयोजित या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी पवार गुरुस्वामी यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा ९८५०६३१९९१ … सामाजिक व धार्मिक जाणिवेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments