HomeBlogDr.Ranganathan ; हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी -...

Dr.Ranganathan ; हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी – NNL

हिमायतनगर | येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 132 व्या जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

IMG 20240812 WA0055 scaled Dr.Ranganathan ; हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी - NNL

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ डी के कदम हे लाभले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख एल एस पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. राजू बोंबले यांनी केले. तसेच या प्रसंगी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा डॉ . एल बी डोंगरे यांनी 05 ग्रंथ ग्रंथालयास भेट दिली . ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपाल प्रा राजू बोंबले व ग्रंथालय सहाय्यक श्री विश्राम देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

IMG 20240812 164149 scaled Dr.Ranganathan ; हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी - NNL

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पवार सर यांनी आपल्या भाषणातून आजच्या युगामध्ये पुस्तकाचे महत्व काय आहे हे सर्वांना पटवून दिले त्याचप्रमाणे विविध उदाहरणे देऊन काळानुरूप व आजची पिढी यासाठी ग्रंथ किती महत्त्वाचे आहेत हे पटवून दिले त्याचप्रमाणे अध्यक्षीय समारोप मध्ये डी के कदम सर यांनी ग्रंथालय ही वधिष्ण संस्था असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले तर आभार डॉ. शेख शहेनाज यांनी केले. सदरील कार्यक्रमाला महाविद्यालयाचा संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थीनींनी ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला.

IMG 20240812 164200 scaled Dr.Ranganathan ; हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी - NNL

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments