BJP’s victory celebration : हिमायतनगर शहरात भाजपच्या विजयाचा जल्लोष

हिमायतनगर,अनिल मादसवार| महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकांपैकी सुमारे २५ ते २६ महानगर – पालिकांवर भारतीय जनता पार्टीने एकहाती वर्चस्व निर्माण करत दणदणीत विजय मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका तसेच नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने प्रभावी कामगिरी करत यश संपादन केले. या निवडणुकीत एकूण ८१ जागांपैकी ४५ जागांवर भाजपला दणदणीत विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

दि. १६ जानेवारी रोजी या आनंदोत्सवात उपस्थित कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण तसेच भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप नेते तथा नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, तालुका अध्यक्ष गजानन चायल, नगरसेवक व भाजप गटनेते आशिष सकवान, नगरसेवक भारत डाके, भाजप युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष कल्याणसिंग ठाकूर, उपतालुकाध्यक्ष विलास वानखेडे, भाजप सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, विपुल दंडेवाड, गणेश रामदीनवार, विशाल जाधव, आनंद गायकवाड, विशाल महाराज यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button