HomeनांदेडMla. Chikhlikar : आ. चिखलीकर यांची आश्वासनपूर्ती ; लोहा नगरपालिकेत ९७ घरकुल...

Mla. Chikhlikar : आ. चिखलीकर यांची आश्वासनपूर्ती ; लोहा नगरपालिकेत ९७ घरकुल लाभार्थ्यांना १ कोटी ३ लाख रुपयांचे अनुदान वाटप

लोहा | नगरपालिका निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रखडलेल्या घरकुल लाभार्थ्यांना न्याय दिला आहे. लोहा नगरपालिकेच्या सभागृहात आज युवा नेते सचिन पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष शरद पवार व उपनगराध्यक्ष करीम शेख यांच्या हस्ते ९७ घरकुल लाभार्थ्यांना एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल योजनेचे अनुदान रखडले होते. निवडणूक काळात “निवडणूक संपल्यानंतर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल,” असे आश्वासन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले होते. त्या शब्दाची आज प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, गटनेते भास्कर पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल, सोनू संगेवार, तसेच नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, अविनाश पवार, गणेश बगाडे, केतन खिल्लारे, पंकज परिहार, हबीब शेख, तुकाराम दाढेल, सतीश निखाते, राजेश बोडके, नारायण येल्लरवाड, रावसाहेब मंजलवाड, विलास कहाळेकर, सदानंद नेलंग, इरबा पवार, उपसभापती श्याम पाटील पवार, शिवा पाटील पवार, माजी नगरसेवक बाबुराव डोम, सूर्यकांत गायकवाड, शहाजी पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष शरद पवार यांनी उर्वरित घरकुल लाभार्थ्यांनाही लवकरच त्यांचे अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चिखलीकर यांच्या आश्वासनपूर्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments