नांदेड| महाराष्ट्र , तेलंगना , कर्नाटका सीमेलगत असलेल्या तालुक्यांच्या रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. या रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे . या अनुषंगाने खा. डॉ. गोपछडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नांदेड जिल्हा महाराष्ट्रातील मोठ्या आकारमानाच्या जिल्हा पैकी एक जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर अंतर्गत देगलूर , बिलोली, मुखेड , नायगाव असे एकूण चार तालुके आहेत . या विभागाचे एकूण क्षेत्रफळ 2734 . 58 किलो मिटर आहे. त्यास अनुसरून शासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग देगलुर अंतर्गत चार उपविभागीय कार्यालय स्थापित केली. सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूरच्या कार्यक्षेत्रात प्रमुख राज्य मार्ग 113.15 किलोमीटर , राज्यमार्ग 312 . 10 किलोमीटर आणि प्रमुख जिल्हा मार्ग 140.20 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत .
या रस्त्यावर 23 मोठे पूल , 95 छोटे पूल आणि 2728 नळकांडी फुल आहेत . ही सर्व रस्ते या विभागाच्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाणे , जिल्हा मुख्यालय , तालुका मुख्यालय , बाजारपेठा , पर्यटन स्थळे , धार्मिक स्थळे , रुग्णालय यांना जोडतात . नांदेड जिल्ह्याला आणि शहराला राज्य सीमावर्ती किंवा आंतरराजाला जोडण्यासाठी बिलोली व देगलूर ही तालुक्याचे सर्वात जवळचे रस्ते आहेत. देगलूर आणि बिलोली हे दोन तालुके महाराष्ट्र तेलंगना आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारी राज्य सीमेवरील तालुके आहेत. यापैकी देगलूर तालुक्यातील एकूण 10 रस्ते राज्य सीमेला जोडणारे आहेत. त्यांची लांबी 222 . 35 किलोमीटर आहे. तसेच बिलोली तालुक्यातील 2 रस्ते राज्य सीमेला जोडणारे असून यांची लांबी ५० किलोमीटर इतकी आहे.
सद्यस्थितीमध्ये राज्य सीमेला जोडणाऱ्या या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे दळणवळणास अडचणी निर्माण होत आहेत . सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील सीमावरती भागातील रस्त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीवसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे. विशेष बाबी ही की कर्नाटका , तेलंगणा राज्यातील गावांना आणि गावकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय उच्च प्रतीच्या सुविधांमुळे सीमावरती भागातील अनेक गावे नेहमीच कर्नाटका, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशात समाविष्ट होण्यासाठी आंदोलने करीत असतात. चळवळ उभी करत असतात.
त्यामुळे सीमावरती भागातील नागरिकांची ही द्वंदआत्मक मानसिकता थांबवून महाराष्ट्रातील सीमावरती भागातील रस्त्याच्या विकासाची कामे तातडीने हाती घ्यावी. खास करून बिलोली आणि देगलूर भागातील सीमावरती भागातील रस्ते विकासासाठी आणि या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती ही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केले आहेत.
गावांचा सर्वांगीण विकास करा
देगलूर आणि बिलोली या तालुक्यातील सीमावर्ती भागातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधावा . या गावांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आत्मीय तळमळीने मागणी केली. सीमावर्ती भागातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अशी मागणी करणारे ते पहिले खासदार ठरले आहेत.