नांदेड| छत्रपती संभाजीनगर विभागातील संचालनालय लेखाकोशागारे कर्मचारी कल्याण समिती मार्फत वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड येथे 11 जानेवारीपासून होत आहे.11 जानेवारीला सकाळी आठ वाजता सायन्स कॉलेज नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ होणार आहे.
11 व 12 जानेवारी या दोन दिवसात विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कुसुम सभागृह नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण 12 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लेखा व कोषागारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लेखा व कोषागार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शासकीय औद्योगिक संस्था हिमायतनगर येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
शासकीय औद्योगिक संस्था, हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त 12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त निबंध, वादविवाद स्पर्धा तसेच उद्योजकांचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी माजी प्रशिक्षणार्थी, नियमित प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालकांनी या उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड यांनी केले आहे.