नवीन नांदेड l नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या माऊली काॅम्पलेक्स ऊस्मानगर रोड लगत असलेल्या मधील 16 गाळे धारकाकडून 28 लाख 26,हजार 990 रूपये मालमता करापोटी येणे असल्याने वसंबंधितांनी टाळाटाळ केल्याने सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या पथकाने 9 जानेवारी रोजी संबंधित गाळे जप्त करून कार्यवाही केली,या कार्यवाही मुळे थकबाकी मालमत्ता धारकात खळबळ उडाली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर वसुलीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त अजितपाल सिंग संधु ,सहाय्यक आयुक्त नरसाळे ,यांच्या नियंत्रणा खाली कर वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयास जप्ती व वसुलीसाठी उद्दीष्ठ दिलेले आहे. त्यानुसार आज 9 जानेवारी 25 रोजी क्षेत्रिय कार्यालय क्र.6 सिडको याअंतर्गत माऊली काॅम्पलेक्स मधील 16 गाळे धारक मालमत्ता धारकांकडे करापोटी रक्कम रु28लाख ,26, हजार 990 एवढी रक्कम येणे बाकी असल्या कारणाने सदरील कराची रक्कम भरण्यासाठी संबंधित मालमत्ता धारकांनी कर भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्या मुळे संबंधित सदरील कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा फरहत उल्ला बेग,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या नियंत्रणा खाली कर निरीक्षक वसंत कल्याणकर ,संजय नागापूरकर,वसुली लिपिक मारोती सारंग,मालु एनफळे ,रविंद्र पवळे,व सतिश महाबळे यांनी केली आहे.
महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांनी आपला चालु व थकीत कराचा भरणा करून करुन महापालिकेस सहकार्य करावे व मालमत्ता जप्ती सारख्या अप्रिय घटना टाळाव्यात असे आवाहन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले आहे.तर यापुढेही अशा कार्यवाही सुरुच राहतील असे उपायुक्त स.अजितपालसिंग संधु यांनी सांगितले आहे.