नवीन नांदेड l श्री गुरुगोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था विष्णुपुरी नांदेड येथे श्री गुरुगोबिंद सिंगजी सिंघजी यांची जयंती (गुरुपूरब) मोठ्या उत्साहात ६ जानेवारी २०२५ रोजी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात “गुरु ग्रंथ साहिब” या ग्रंथाचे एका सजलेल्या खास वाहनातून संस्थेच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमा साठी नांदेड भूषण श्री संत बाबा बलविंदर सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेब ट्रस्ट, नगीना घाट,नांदेड तसेच मुख्य गुरुद्वारा येथील मित जत्थेदार श्री ज्योतिन्दर सिंघजी,संस्थेचे नियमक मंडळाचे सदस्य तथा गुरुद्वारा नानक सर साहेबचे प्रमुख संत बाबा सुखविंदर सिंघजी व इतर अनेक पंचप्यारे, शिख समुदायातील वरिष्ठ संत,संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे,संस्थेचे नियमक मंडळाचे सदस्य डॉ.डी. डी.डोये, डॉ.जे.व्हि.मेघा,संस्थेतील विविध अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस “गुरु ग्रंथ साहिब” या धर्म ग्रंथास पुष्पहार व पुष्प अर्पण करून यथोचित पूजन करण्यात आले. याप्रसंगी माननीय संत बाबा बलविंदर सिंघजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना म्हणाले की, श्री गुरुगोविंद सिंघजी यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत त्यांच्याच नावाने असलेल्या तंत्र शिक्षण संस्थेत आपण शिक्षण घेत आहात. तुम्ही भाग्यवान आहात आपण चांगले शिक्षण घेऊन संस्थेचे नाव व आपले नाव उज्वल करा.
भाई सरबजीत सिंघजी निर्मले, कथाकार, तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत श्री गुरुगोबिंद सिंघजी यांच्या चरित्रावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी गुरुगोबिंद सिंघजी यांच्या जीवनातील विविध पैलू वर प्रकाश टाकला श्री गुरुगोबिंद सिंघजी यांनी सांगितलेली विविध तत्वे सांगून त्या तत्त्वाचे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व सर्वांनी पालन करण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमानंतर सर्वासाठी लंगर (प्रसाद) चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शीख समुदायातील संत व नागरिक यांचेसह संस्थेतील प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील विद्यार्थी सरदार हरजित सिंघ ढिल्लो, सरदार धन्नासिंघ ढकणे, इतर विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.