Sri Guru Gobind Singh ; श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड, येथे श्री गुरुगोबिंद सिंघजी जयंती (गुरुपूरब) मोठ्या उत्साहात साजरी – NNL
नवीन नांदेड l श्री गुरुगोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था विष्णुपुरी नांदेड येथे श्री गुरुगोबिंद सिंगजी सिंघजी यांची जयंती (गुरुपूरब) मोठ्या उत्साहात ६ जानेवारी २०२५ रोजी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात “गुरु ग्रंथ साहिब” या ग्रंथाचे एका सजलेल्या खास वाहनातून संस्थेच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमा साठी नांदेड भूषण श्री संत बाबा बलविंदर सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेब ट्रस्ट, नगीना घाट,नांदेड तसेच मुख्य गुरुद्वारा येथील मित जत्थेदार श्री ज्योतिन्दर सिंघजी,संस्थेचे नियमक मंडळाचे सदस्य तथा गुरुद्वारा नानक सर साहेबचे प्रमुख संत बाबा सुखविंदर सिंघजी व इतर अनेक पंचप्यारे, शिख समुदायातील वरिष्ठ संत,संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे,संस्थेचे नियमक मंडळाचे सदस्य डॉ.डी. डी.डोये, डॉ.जे.व्हि.मेघा,संस्थेतील विविध अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कर्मचारी व विद्यार्थी ...
