Friday, May 15

Herb Day in Nanded District by Patanjali : पतंजलीतर्फे नांदेड जिल्ह्यात जडीबुटी दिवस उत्साहात योग – NNL

नांदेड| आधुनिक धन्वंतरी अशी ओळख असलेले पतंजलीचे सर्वेसर्वा आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवस निमित्ताने पतंजली योग समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांचा जन्मदिवस हा जडीबुटी दिवस म्हणून साजरा केल्या गेला. नांदेड जिल्हा पतंजली समितीच्यावतीने या निमित्ताने योग, यज्ञाबरोबरच वृक्षारोपण, वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्वचे राज्य प्रभारी आदरणीय दिनेश जी राठोड हे जडीबुटी दिवसानिमित्त नांदेड नगरीत उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून वसंतराव कल्याणकर यांच्या भूखंडावर, डॉ. श्रीराम राठोड यांच्या गोशाळेत वृक्षारोपण करण्यात आले. कृष्ण मंदिर काबरा नगर येथे दीडशे साधकांचा योग वर्ग पार पडला. व योग साधकाद्वारे दिनेश राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्वांना तुळशीचे रोप वाटप केले व मंदिर परिसरात तुळशीचे रोप करण्यात आले.

‌सातोनकर बंधू यांचे चितळे एक्सप्रेस ठिकाणी भव्य जडीबुटी प्रदर्शन लावण्यात आले. आचार्य बाळकृष्ण यांनी लिहिलेल्या जडीबुटीबद्दल लिहिलेली माहिती भिंतीपत्रकाद्वारे प्रसारित करण्यात आली. तसेच प्रदर्शनीत विविध वनस्पती व वृक्ष ठेवण्यात आले. प्रदर्शनात येणाऱ्या साधकांना गुळवेल, तुळस, अंबा, पानफुटी, अलवेरा असे विविध वनस्पतीचे रोप देण्यात आले. जडीबुटी प्रदर्शनाच्या ठिकाणी आदरणीय दिनेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याची गरज आहे, एका व्यक्तीने वर्षभरात किमान एक तरी झाड लावावे व लावलेले झाड जगवावे, असे सांगितले.

IMG 20240805 WA0076 Herb Day in Nanded District by Patanjali : पतंजलीतर्फे नांदेड जिल्ह्यात जडीबुटी दिवस उत्साहात योग - NNL

याप्रसंगी दत्तात्रय जी काळे, अनिल जी शेटकार, पंढरीनाथ जी कंठेवाड, डॉ रमेश नारलावार, पुंडलिकराव निर्मळे, विठल सोळुंके, डॉ. श्रीराम राठोड, विमलताई राठोड, संतोष मुगटकर, जयंत दंडवते, उर्मिला साजणे, रावसाहेब साजणे, नारायणलाल कलंत्री, गंगालाल यादव, उपायुक्त मिर्झा बेग, सुरेश लंगडापुरे, राजेश सातोनकर, उमेश सातोनकर, राधिका सातोनकर, राम शिवपनोर शिवाजी शिंदे हळदेकर, महारुद्र माळगे, महानंदा माळगे, जगन्नाथ येईलवाड, मोहम्मद अरीफ, मारुती काका, स्वाती बेंबरे, सुरेखा घोगरे, नंदिनी चौधरी, नारायण कुलकर्णी, गंगाबाई मारमपल्ले, अनिल कदम, शिवाजी मुलंगे, बाबाराव हंबर्डे, उत्तमराव वट्टमवार, शाम कदम, श्यामा मालपाणी, सुनीता डांगे, मीनाक्षी चीलरगे, प्रभावती हरदडकर, मंगला पांडे, प्रभावती कटके, सुनिता आघाव, दिलीप बाष्टेवाड, दिलीप आघाव, शैलेंद्र नावडे, कैलास बोंडले, यादगिरी गज्जल, शिवाजी पेन्सलवार, श्रीराम मोरे, सविता गबाळे, दिलीपराव तिडके, मदन बैस, रामकृष्ण चक्रवार, सोपानराव मारकवाड, तुळशीराम टाके, संदीप भाईकाटे, लक्ष्मीकांत, सुभाष मगर, अशोकराव पाटील, प्रल्हाद घोरबांड, सुरेश दंडवते, हनुमंत ढगे, शंकर परकंटे, चंपक पांचभाई, मारुती , प्रकाश येलेकर, प्रीतम भराडिया, गणेश साखरे, कैलास अनिलकंठवार, सिद्धेश अनिलकंठवार, पंडित पाटील, भगवान किडे, अनिल कामिनवार, शेख अब्दुल, सुनील जाधव, नामदेव मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

IMG 20240805 WA0078 Herb Day in Nanded District by Patanjali : पतंजलीतर्फे नांदेड जिल्ह्यात जडीबुटी दिवस उत्साहात योग - NNL

भक्ती लॉन्स नांदेड ठिकाणी योग, भक्ती गीते, जडीबुटीचे वितरण, मरळक ठिकाणी सहल असा कार्यक्रम घेण्यात आला. पारस नगर नांदेड ठिकाणी डॉ. नंदिनी चौधरी, चंदा हळदे, शुभांगी महात्मे यांनी योग वर्गात जडीबुटी औषधी रोपांचे वाटप केले. धर्माबाद ठिकाणी अनिल आर्य व डॉ. मारुती ईजळकर यांच्या नेतृत्वात जडीबुटी वनस्पती रोपाचे वाटप योग वर्गात करण्यात आले. मुखेड तालुक्यात षण्मुख मठदेवरु, संध्या मठदेवरु यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी वनस्पतीचे वाटप, एक दिवसीय योग शिबिर व वृक्षारोपण असे कार्यक्रम घेण्यात आले. मंगळवार दि.६ रोजी उर्मिला साजने व सविता गबाळे यांच्या माध्यमातून एन. एस. बी. कॉलेज येथे नांदेड नगरीतील योगशिक्षकांना जडीबुटी तसेच वृक्षरोपणासाठी वृक्ष वितरण करण्यात येणार आहेत. जिल्हाभरात पार पडलेल्या विविध कार्यक्रमांतून जडीबुटी दिन निमित्ताने सर्व योग साधकांनी आयुर्वेद वनस्पतीचे महत्व सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केल्याचे, अनिल अमृतवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!