Gopchade’s demand : सीमावर्ती भागातील रस्ते विकास करण्याची राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे खा.डॉ. गोपछडे यांची मागणी -NNL
नांदेड| महाराष्ट्र , तेलंगना , कर्नाटका सीमेलगत असलेल्या तालुक्यांच्या रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. या रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे . या अनुषंगाने खा. डॉ. गोपछडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नांदेड जिल्हा महाराष्ट्रातील मोठ्या आकारमानाच्या जिल्हा पैकी एक जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर अंतर्गत देगलूर , बिलोली, मुखेड , नायगाव असे एकूण चार तालुके आहेत . या विभागाचे एकूण क्षेत्रफळ 2734 . 58 किलो मिटर आहे. त्यास अनुसरून शासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग देगलुर अंतर्गत चार उपविभागीय कार्यालय स्थापित केली. सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूरच्या कार्यक्षेत्रात प्रमुख राज्य मार्ग 113.15 किलोमी...
