Wednesday, May 13

Lokhandwadi Women Aggressive : अनधिकृतपणे रसायन मिश्चित हातभट्टी, देशी दारू विकणाऱ्यांवरील कार्यवाहीसाठी लोखंडवाडीच्या महिला आक्रमक

किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेडच्या किनवट तालुक्यातील रसायन मिश्रित बनावट हातभट्टी दारू व देशी दारूची अनाधिकृतपणे विक्री केली जात असल्याने या गावातील दहा वर्षाच्या मुलापासून ते युवा तरुण पिढी दारूच्या व्यसनी होऊन अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत तर अशा या रसायन मिश्रित हातभट्टी दारूमुळे व देशी दारूमुळे अनेक युवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गावातील रसायन मिश्रित हातभट्टी दारू व देशी दारू अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत संतप्त झालेल्या महिलांनी इस्लापूर पोलीस ठाणे येथे येऊन अनाधिकृतपणे दारू विकणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इस्लापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या लोखंडवाडी या आदिवासी गावात मागील सात वर्षापासून गावठी रसायन मिश्चित हातभट्टी दारू व देशी दारू बंद होती परंतु काहींनी पुन्हा सुरू केल्यामुळे येथील विक्री करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून या गावातील दारुमुळे पिणाऱ्याची व विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे गावातील दहा वर्षाच्या मुलांपासून ते नवयुवक तरुण वर्ग व्यसनाधीन झाला आहे त्यामुळे येथील व्यसनाधीन झालेल्या तरुणाचे संसार उघड्यावर आले आहेत तर काही रसायन मिश्रित हातभट्टी व देशी दारू च्या आहारी गेलेल्या तरुणांच्या शरीरावर अपायकारक परिणाम झाल्यामुळे अनेक तरुणांचा जीव गेला आहे.

IMG 20250206 WA0013 Lokhandwadi Women Aggressive : अनधिकृतपणे रसायन मिश्चित हातभट्टी, देशी दारू विकणाऱ्यांवरील कार्यवाहीसाठी लोखंडवाडीच्या महिला आक्रमक

त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत लोखंडवाडी या गावात रसायन मिश्चित हात व हातभट्टी व देशी दारू अनधिकृतपणे विकण्याची संख्या वाढली आहे त्याचबरोबर दारू पिणाऱ्यांची संख्या देखील तितकीच वाढली आहे हातभट्टी व देशी दारू मध्ये नशेचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्याही रसायनाचा उपयोग होत असल्याने शरीरावर देखील त्याचा परिणाम होऊन विषारी दारूमुळे अनेक युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती संतप्त झालेल्या महिलांनी याप्रसंगी दिली असून अशा या रसायन मिश्चित दारूमुळे अनेक माणसे दगावल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी अशा अनाधिकृतपणे देशी व बनावट गावठी रसायन मिश्रीत दारू विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी लोखंड वाडीतील महिलांनी केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने व येथील स्थानिक पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास इस्लापूर ते शिवनी जाणाऱ्या राज्य मार्गावर जनआंदोलन छेडण्यात येईल व पुढील उद्भवणाऱ्या परिस्थितीला राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस जबाबदार असतील असा इशारा देखील लोखंडवाडी येथील महिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात केला आहे. मागणी केलेल्या अर्जावर अंजनाबाई नामदेव खरोडे लक्ष्मीबाई कोंडबा मिरासे यशोदा दत्ता लोखंडे कांताबाई माणिकराव माजलकर कविता गोमाजी झाडे अशा अनेक महिलांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!