One accused of forced theft arrested : जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक; 44 ग्रॅम सोन्याचे 03 गंठण असा एकूण 3 लक्ष 21 हजार 527 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड| जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक करुन त्याचे कडुन 44 ग्रॅम सोन्याचे 03 गंठण असा एकूण 3 लक्ष 21 हजार 527 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाने हि कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ‘ऑपरेशन फ्लश ऑऊट’ अंतर्गत केली आहे.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ‘ऑपरेशन फ्लश ऑऊट’ अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 04/09/2024 रोजी डी.वी. पथकाचे पो.उपनि. विनोद भा.देशमुख सोबत डी. बी. पथकाचे अमंलदार पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमधील मालेगाव रोडने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.नं. 291/2024 कलम 309(4),3(5) बी.एन.एस हा गुन्हा केलेला आरोपी हा मालेगाव ता. अर्धापुर जि.नांदेड येथील नांदेड स्पेशल आलु बिर्याणी या हॉटेलवर आहेत.

त्यावरुन वरील अधिकारी व अमंलदार असे सदर ठिकाणी जावुन एका इसमास पकडुन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मुकेश पिता गजानन कल्याणकर वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी रा. देवीनगर, मालेगाव ता. अर्धापुर जि.नांदेड असे सांगितले. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने व त्याचे सोबतचे इतर आरोपी नामे गणेश दिलीप धवाले, राहुल जाधव व यश चितडवाड तीघे रा. शिवनगर, नांदेड यांनी वरील गुन्हा केला असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाकडुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड 291/2024 कलम 309 (4), 3 (5) बी.एन.एस. मधील दोन सोन्यांचे गंठण व पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.नं. 239/2024 कलम 392,34 भा.दं. वि. मधील एक असे 03 सोन्याचे गंठण 44 ग्रॅम वजनाचे किमती 3,21,527/-रुपयाचे असा 100 टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्रीमती किरितीका.सि.एम. सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग नांदेड शहर, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली श्री रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील पो.उपनि.विनोद. भा. देशमुख, पोहेकों गजानन किडे, पोहेकों प्रदिप गर्दनमारे, पोकों ओमप्रकाश कवडे, पोकों सुर्यभान हासे व पोकों नवनाथ गुट्टे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button