One accused of forced theft arrested : जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक; 44 ग्रॅम सोन्याचे 03 गंठण असा एकूण 3 लक्ष 21 हजार 527 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL
नांदेड| जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक करुन त्याचे कडुन 44 ग्रॅम सोन्याचे 03 गंठण असा एकूण 3 लक्ष 21 हजार 527 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाने हि कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी 'ऑपरेशन फ्लश ऑऊट' अंतर्गत केली आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी 'ऑपरेशन फ्लश ऑऊट' अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 04/09/2024 रोजी डी.वी. पथकाचे पो.उपनि. विनोद भा.देशमुख सोबत डी. बी. पथकाचे अमंलदार पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमधील मालेगाव रोडने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.नं. 291/2024 कलम 309(4),3(5) बी.एन.एस हा गुन्हा केलेला आरोपी हा मालेगाव ता. अर्धापुर जि.नांदेड येथील नांदेड स्पे...
