Penalty by third party Payal slapped for Bhokar Assembly : भोकर विधानसभेसाठी थोपटले तृतीय पंथी पायल ने दंड -NNL

भोकर, गंगाधर पडवळे| महाराष्ट्र राज्यसह अनेक राज्यात पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका लागणार असल्यामुळे प्रमुख पक्षासह अनेकजण आमदारकी लढवण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यातच भोकर विधानसभा क्षेत्र नेहमीच काही ना काही गोष्टी साठी राज्यात चर्चेत असते त्याच कारणाने की काय. मागच्या लोकसभेचा निकाल पाहता येथील काँग्रेस पक्षा कडे अनेकांनी उमेदवारी साठी मागणी केली तर सध्या तरी भाजपा कडून एकाच महिलेची मागणी दिसत आहे अशात आता भोकर चा आमदार मला व्हायचं अशी भूमिका घेत थेट पत्रकार परिषद घेऊन तृतीय पंथी पायल ने करत भावी आमदारांना एक प्रकारे धक्काचं दिला.


भोकर विधानसभा हे नेहमी काही ना काही विषयासाठी चर्चेत असते त्यातच आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने अनेकांच्या भुवया उनंचावल्या आहेत. जो-तो म्हणतो मला आमदार व्हायचं. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सरळ सामना राहण्याचे सध्यातरी चिन्ह दिसत आहे. तर मागील लोकसभेला नांदेड जिल्हाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षण, जारांगे पाटील फॅक्टर चांगलाच चाललेला दिसतो म्हणूनच महाविकास आघाडीतील कमालीच्या जागा निवडून आल्या आहेत. आज घडीलाही सध्यातरी तीच परिस्थिती कायम दिसत आहे.

भोकर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे आमदार माजी मुख्यमंत्री व विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण ह्यांनी मागील लोकसभा निवडणुकी पूर्वी काँग्रेस पक्षाचा हात सोडून हाती कमळ धरलं आणि जिल्हा काँग्रेस मुक्त केला असा भास झाला होता पण येथील काँग्रेस वर प्रेम करणारे बहाद्दर मतदार आणि जुने, जाणते कार्यकर्ते यांनी आपली मोठ बांधून सर्वांना एकत्र घेऊन दिवसरात्र एक करून सद्याची परिस्थिती,योजनांची खैरात,विकास कामांचा हिशोब,बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शैक्षणिक सोयीचा अभाव, जलसिंचन व्यवस्था आदी विषयावर सखोल मार्गदर्शन अगदी खोल पर्यंत पोहचविले आणि मराठा आरक्षण हा विषय कळीचा मुद्दा ठरला याच सर्व बाबींचा परिणाम म्हणून की काय लोकसभेत काँग्रेस पक्षाचे वसंतराव चव्हाण हे विजयी झाले.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजही अनेक गावत गावात अनेक बडे नेते व त्यांचे भावी आमदार यांना ठीक ठिकाणी काळे झेंडे दाखविले जात आहेत. गावागावात प्रवेश बंदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तर अनेकदा आरक्षणा वरून,घराणेशाही वरून त्याच बरोबर त्याच्या सभोतालच्या लोकांमुळे साहेब व सर्वसामान्य जाणता यांच्यात जे फार मोठी दरी निर्माण झाली या अनेक गोष्टीचा आता दुरगामी परिणाम होताना दिसत आहे. ह्या गोष्टी हळू हळू एका एकाने पुढे येत आहेत.याचसाठी येणाऱ्या निवडणुकीत सावधागिरी बाळगणे हे वरील कारणासाठी अतिशय महत्वाचे ठरेल.

तर आता काँग्रेस पक्षाकडून भोकर विधासभेसाठी आता पर्यंत १२इच्छुकांनी उमेदवारी साठी मागणी केली असून भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारीच्या मैदानात स्वयं घोषित उमेदवार म्हणून अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांचं नाव सध्यातरी दिसत आहे अशी ओरड काँग्रेस चे बाळासाहेब पाटील रावणगावकर करीत आहेत . पण अचानक शुक्रवार दि. १६ रोजी घेतलेल्या शासकीय विश्राम गृह येथील पत्रकार परिषदेत तृतीय पंथी पायल पांडुरंग मीराशे ह्यांनी मी ही विधानसभा अपक्ष म्हणून सर्व ताकतीनिशी लढावणार असून तशी तयारी आम्ही सुरु केली आहे अशी माहिती दिली आहे.
पुढे बोलताना तृतीय पंथी पायल म्हणाल्या की आमचे जीवन हे जीवन नसून नर्क आहे. समाजात आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पहिले जाते आम्हाला समाजात हीन वागणून दिल्या जाते त्यामुळे आमच्या जीवनावर आघात होतात समाजात ताठ मानेने जगाचे आहे वरील कारणामुळे माझे शिक्षण अर्धवट राहिले असून त्यावर भरीव काम करण्याची माझी इच्छा आहे महिलांना त्यांच्या घरबसल्या हाताला काम, तर समाजातील सर्व स्तरातील तळागाळातील, गोर गरीब जनतेची हाल अपेष्ठा मला पाहवत नाही त्याकरिता मला आमदार होऊन त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. तसा भोकर तालूका अद्यापही बऱ्याच बाबतीत खूपच मागासलेला आहे. येथे धड शिक्षणाची व्यवस्था नाही, ना एकही व्यापार, उद्योग नाहीत ना शेती साठी कायम पाण्याची व्यक्ती व्यवस्था. गेली ७७वर्षात साध शेतकऱ्यांना त्यांची शेतीसाठी मुबलक हे स्वतःला मोठे पुढारी समजणारे पाणी देखील अनु शकले नाहीत.
ना बेरोजगारीवर उपाय केला. आम्हाला ना घर ना दार ना नवरा ना बायको ना मुलं बाळ त्यामुळे आम्हाला मागे संपत्ती जमा ठेवण्याची गरज भासत नाही याच कारणमुळे मला भोकर विधानसभेचा आमदार करा बघा वरील सर्व या भागाचा विकासात्मक अनुशेष भरुन काढतो की नाही ते फक्त संधी द्या जे यांना जमलं नाही ते मी एक किन्नर करून दाखवते असे आश्वासन देखील या प्रसंगी पायल मिरासे हिने दिल.एका तृतीय पंथी व्यक्तीने घराणेशाही, बलाढ्यराजकारणी, यांच्या विरोधात विधानसभा लढविण्यासाठी दंड थोपटल्यामुळे भोकर विधानसभा क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.



