Penalty by third party Payal slapped for Bhokar Assembly : भोकर विधानसभेसाठी थोपटले तृतीय पंथी पायल ने दंड -NNL
भोकर, गंगाधर पडवळे| महाराष्ट्र राज्यसह अनेक राज्यात पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका लागणार असल्यामुळे प्रमुख पक्षासह अनेकजण आमदारकी लढवण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यातच भोकर विधानसभा क्षेत्र नेहमीच काही ना काही गोष्टी साठी राज्यात चर्चेत असते त्याच कारणाने की काय. मागच्या लोकसभेचा निकाल पाहता येथील काँग्रेस पक्षा कडे अनेकांनी उमेदवारी साठी मागणी केली तर सध्या तरी भाजपा कडून एकाच महिलेची मागणी दिसत आहे अशात आता भोकर चा आमदार मला व्हायचं अशी भूमिका घेत थेट पत्रकार परिषद घेऊन तृतीय पंथी पायल ने करत भावी आमदारांना एक प्रकारे धक्काचं दिला.
भोकर विधानसभा हे नेहमी काही ना काही विषयासाठी चर्चेत असते त्यातच आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने अनेकांच्या भुवया उनंचावल्या आहेत. जो-तो म्हणतो मला आमदार व्हायचं. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सरळ सामना राहण्याचे सध्यातरी चिन्ह दि...
