HomeनांदेडAriba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील ७ वर्षीय अरीबा तस्कीन मिर्झा अकबर बेग हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवत धार्मिक परंपरेचा सुंदर आदर्श निर्माण केला. रविवारी (८ मार्च) तिने पहिला रोजा ठेवल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी तिचे नाना असद मौलाना, मोठे मामूजान मोहम्मद मुदस्सिर, छोटे मामूजान मोहम्मद मुबाशिर, तसेच नानी साहेबा, दादी साहेबा, कुटुंबातील खाला, खालू आणि इतर नातेवाईक उपस्थित होते. अरीबाच्या पहिल्या रोज्याबद्दल सर्वांनी तिचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

तसेच कुटुंबातील मिर्झा जहीर बेग, मिर्झा अजहर बेग, मिर्झा अब्बास बेग, मिर्झा खादिर बेग, मिर्झा गनी बेग, मिर्झा सलाम बेग यांच्यासह तिचे वडील मिर्झा अकबर बेग आणि इतर नातेवाईकांनी अरीबाच्या या धार्मिक जिद्दीचे कौतुक करत तिच्यावर फुलांचा वर्षाव करून अभिनंदन केले.

यावेळी उपस्थित सर्वांनी अरीबा तस्कीनच्या धार्मिक भावना व जिद्दीचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आनंद व्यक्त करत छोटेखानी सत्कारही केला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments