HomeनांदेडBaradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात

Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात

हदगांव l  नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा, विविध दाखले-प्रमाणपत्रे तसेच शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ आणि जलद पद्धतीने मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन हदगांव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले.

ते ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेअंतर्गत बरडशेवाळा येथे आयोजीत समाधान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने महिला पुरुष नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय सेवांची माहिती घेतली.

IMG 20260308 WA0000 Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात

प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून महसूल सेवा, विविध दाखले-प्रमाणपत्रे, जमीन विषयक अभिलेखे तसेच इतर शासकीय योजनांची माहिती व लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा या शिबिराचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील नागरिकांना आवाहन करत, जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. या प्रसंगी तहसीलदार उमर शेख, नायब तहसीलदार तामसकर, नायब तहसीलदार काकडे, टीएचओ मुरमुरे, कृषी अधिकारी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे, गजानन अनंतवार यांच्यासह मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments