नांदेड/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर – किनवट राष्ट्रीय महामार्गावर नव्याने सुरू झालेल्या किंग्स वाईन शाॅपला राज्य उत्पादन शुल्क विभागांच्या वतीने सील लावण्यात आले आहे. हि कारवाई दि. ३ जानेवारी २०२५ शुक्रवारी दुपारी करण्यात आली.
हिमायतनगर शहरातील मुख्य रस्ता किनवट, नांदेड महा मार्गावर नव्याने किंग्स वाईन शाॅप दारूचे देशी, विदेशीचे दुकान थाटण्यात आले आहे. जवळपास एक ते दिड महिन्याचा कालावधी सदरचे दुकान थाटून झाला आहे. तर दि. ३ जानेवारी शुक्रवारी दुपारी उत्पादन शुल्क विभागाचे एक पथक येथे आले आणी त्यांनी या शाॅपला सील केले. या बाबतीत अधिक माहीती घेण्यासाठी संबंधित अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. त्यामुळे याबाबतची अधिक माहीती मिळू शकली नाही.
अचानक दुकान बंद झाल्याने मद्दपीचा चांगलाच हिरमोड झाला आहे. हिमायतनगर येथै परवानाधारक देशी दारूची चार दुकाने असून, बियर बारची चार पाच दुकाने आहेत. देशी व विदेशी दारू विक्रेते चढ्या भावाने दारूची विक्री करीत असल्याच्या अनेक तक्रारी मागील काळात झाल्या आहेत. दरम्यान येथे वाईन शाॅप उघडल्याने मद्दपीची चांगली सोय झाली होती. आज दि. ३ रोजी उत्पादन शुल्क विभागाने या किंग्स दुकानाला सील केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागांच्या आजच्या कारवाईचा अहवाल थंड बस्त्यात असून इन्स्पेक्शन असे रूप या कारवाईला देण्यात येत असले तरी दिड दोन महिन्यातच इन्स्पेक्शन कसे काय? होवू शकते असा सवाल ही सुजाण नागरीकातून उपस्थित केला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र सध्या नाॅटरिचेबल आहेत. त्यामुळे मॅनेजचा प्रकार आहे की… काय..? अश्या चर्चेलाही तोंड फूटले …. हे इथे विशेष.