नांदेड| नांदेड ग्रामीण पो.स्टे. येथे शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा गुन्हयातील सहा आरोपी कडून दोन लोखंडी खंजर ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कलम 68,69 म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत रेकॉर्ड वरील व हिस्ट्रीशीट आरोपो चेक करणे बाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. सुशीलकुमार नायक साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, नांदेड व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नांदेड ग्रामीण हद्दित सकाळी 04.00 ते 07.00 वाजताचे दरम्यान रेकॉर्डवरील व हिस्ट्रिशीट आरोपी चेक करणेसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली.
1) संतोष किशन कंधारे वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. नवी आबादी विष्णुपुरी, ता.जि.नांदेड, 2) संघर्ष सुनील पवळे वय 25 वर्ष व्यवसाय बेकार रा. बळीरामपुर ता. जि.नांदेड, 3) सतीष बालाजी चव्हाण वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. बळीरामपुर ता. जि. नांदेड, 4) ओमनाथ बालाजी चव्हाण वय 25 वर्ष व्यवसाय बेकार रा. बळीरामपुर ता. जि. नांदेड, 5) संघरत्न माधव बाघमारे वय 18 वर्ष व्यवसाय बेकार रा. शाहुनगर, वाघाळा, नांदेड वरील आरोपीताकडून दोन लोखंडी खंजर किमती 1000/- रुपये असे जप्त करण्यात आले आहे.
सदर विशेष मोहिम दरम्यान दोन आरोपीकडे लोखंडी खंजर मिळुन आल्याने ते जप्त करुन त्याचेवर कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तीन आरोपी हे वेगवेगळ्या भागात संशयास्पद रिल्या चोरी करण्याचे उद्देशाने दबा धरुन बसलेले मिळुन आल्याने त्याचेवर कलम 122 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे वेगवेगळी तीन गुन्हे दाखल केले आहेत. कलम 68,69 म.पो.का. प्रमाणे एकूण सहा आरोपी ताब्यात घेतले होते.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, नांदेड, ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रा., पोहेकॉ/492 जाधव, पोहेकॉ/1991 वाकडे, पोहेकों/1812 सत्तार, पोकों/221 माने, पोकों/599 पचलिंग, पोकों/2907 कलंदर, पोकॉ/946 कल्याणकर, महेश कोरे पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण 4) विश्वदिप रोडे, पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण पोकों/1500 सिरमलवार, सर्व पो.स्टे. नांदेड ग्रा. यांनी गुन्हा उघडकीस अनन्यसाठु परिश्रम घेतले.