Seal at King’s Wine Shop at Himayatnagar : हिमायतनगर येथील किंग्स वाईन शाॅपला सील ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..! -NNL
नांदेड/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर - किनवट राष्ट्रीय महामार्गावर नव्याने सुरू झालेल्या किंग्स वाईन शाॅपला राज्य उत्पादन शुल्क विभागांच्या वतीने सील लावण्यात आले आहे. हि कारवाई दि. ३ जानेवारी २०२५ शुक्रवारी दुपारी करण्यात आली.
हिमायतनगर शहरातील मुख्य रस्ता किनवट, नांदेड महा मार्गावर नव्याने किंग्स वाईन शाॅप दारूचे देशी, विदेशीचे दुकान थाटण्यात आले आहे. जवळपास एक ते दिड महिन्याचा कालावधी सदरचे दुकान थाटून झाला आहे. तर दि. ३ जानेवारी शुक्रवारी दुपारी उत्पादन शुल्क विभागाचे एक पथक येथे आले आणी त्यांनी या शाॅपला सील केले. या बाबतीत अधिक माहीती घेण्यासाठी संबंधित अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. त्यामुळे याबाबतची अधिक माहीती मिळू शकली नाही.
अचानक दुकान बंद झाल्याने मद्दपीचा चांगलाच हिरमोड झाला आहे. हिमायतनगर येथै परव...
