Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

नांदेड| पाण्याच्या मोटार चोरीच्या मालिकेचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावला असून तीन आरोपींना अटक करून चोरीस गेलेल्या मोटारींपैकी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील व उपअधीक्षक मा. श्री. सुजित गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अनुपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 61/2026 व 62/2026 कलम 303 बीएनएस अंतर्गत पाण्याच्या मोटारी चोरीची नोंद झाली होती. तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक उदय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले.

अटक आरोपींची नावे माधव शंकरराव राजुरे (वय 24 वर्षे) कृष्णा दत्तात्रय राजुरे (वय 19 वर्षे) राजेश दत्ता राजुरे (वय 19 वर्षे, रा. शेळगाव ता. अर्धापूर, जि. नांदेड) आरोपींकडून एकूण ५४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात २०,००० रुपये किमतीच्या चार पाण्याच्या मोटारी व ३४,५०० रुपये किमतीच्या पाच चोरीस गेलेल्या मोटारींचा समावेश आहे.

सदर कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक व पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, मोटार चोरीच्या वाढत्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button