Wednesday, May 13

Shrikant Lalge ; महिलानी बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे- मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे

लोहा l बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधता येते लघु उद्योग उभारता येतात तसेच महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल तेव्हा या माध्यमातून

महिलांनी आत्मनिर्भर व्हावे असे मार्गदर्शन मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी केले

नगर परिषद येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १२ मार्च रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या पुढाकारातून शहरातील बचत गटातील महिलांचे मोफत आरोग्य तपासणी व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हिते यासाठी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंजुषा जाधव यांनी पुढाकार घेतला

मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे मार्गदर्शन करताना म्हणाले की महिलांनी शिक्षणाबरोबर आपल्या पाल्याला सुसंस्कारांची सांगड घालावी महिला सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धरी याचा अनुभव येतोय। व्यवसायासह आधुनिक शेती व नौकरी आदी क्षेत्रात आपली स्थान अधिक मजबूत करणे गरजेचे आहे असे श्री लाळगे त्यांनी सांगितले

स्त्री रोग तज्ञ डॉ. श्रीदेवी चव्हाण,अँड कविता पैळ, सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मीबाई जाधव शिक्षिका वर्षा जामगे पोलीस कर्मचारी भाग्यश्री वंजारवाडेकर , लोहा नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक लता ढवळे,दिव्यांग भाजीपाला विक्रेत्या सुनिता नखाते,मंजुषा पोषटवार यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा रोपटे , शाल देऊन सन्मान करण्यात आला

कार्यक्रमासाठीमहिला बचत गटाच्या समन्वयिका उषा शिंदे ,सविता सातेगावे, शिल्पा जाधव, स्वाती इंदुरकर, गिरीजा काळे, यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी मंजुषा जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता चव्हाण यांनी केला आहे.

महिलांना कर्करोगासंदर्भात जनजागृती

लोहा नगरपालिका कार्यालय जागतिक महिला दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयाचे अब्दुल बारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रूबी सय्यद,डॉ.पूर्वा सरकार ,डॉ. पंकज गोरे ,आरोग्य सेविका गंगासागर या सर्व टीमने महिलांचे आरोग्य तपासणी मोफत केली व औषध गोळ्या वाटप करण्यात आल्या कर्करोगाच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!