उस्माननगर l उस्माननगर येथून जवळच असलेल्या शंभरगांवचे माजी सरपंच तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गौतम ज्ञानोबा बनसोडे यांची नांदेड जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.


काँग्रेसचे नांदेड जिल्हाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी दिनांक १३ सप्टेंबर २०२५ शनिवार रोजी नियुक्ती केली आहे त्यांना नियुक्तीपत्र देतेवेळी नांदेडचे माजी महापौर अब्दुल गफार ,पाली महाराज यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


गौतम बनसोडे हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल काँग्रेसच्या वतीने तसेच नांदेड जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे ..




