Shrikant Lalge ; महिलानी बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे- मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे
लोहा l बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधता येते लघु उद्योग उभारता येतात तसेच महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल तेव्हा या माध्यमातून
महिलांनी आत्मनिर्भर व्हावे असे मार्गदर्शन मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी केले
नगर परिषद येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १२ मार्च रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या पुढाकारातून शहरातील बचत गटातील महिलांचे मोफत आरोग्य तपासणी व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हिते यासाठी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंजुषा जाधव यांनी पुढाकार घेतला
मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे मार्गदर्शन करताना म्हणाले की महिलांनी शिक्षणाबरोबर आपल्या पाल्याला सुसंस्कारांची सांगड घालावी महिला सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धरी याचा अनुभव येतोय। व्यवसायासह आधुनिक शेती व नौकरी आदी क्षेत...
