Superintendent of Police Nanded arrested : पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ०३ इसमांना नांदेड जिल्हयातुन तडीपार केले -NNL

नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार एका टोळीतील ०३ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर सहा महीण्याचे कालावधी करीता हद्दपार केले आहे. तसे अंतिम आदेश पारीत करण्यात आले आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु केली आहे.

पोलीस ठाणे उमरी यांचेकडुन कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये वर नमुद इसमांना हद्दपार करण्यासंबंधाने प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यामध्ये कायदेशीर चौकशीची प्रक्रिया पुर्ण करुन मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी एका टोळीतील अनिल व्यंकटी खांडरे वय २६ वर्ष रा. वाडीरोड उमरी ता. उमरी जि. नांदेड, संतोष शंकर गंगासागरे वय २७ वर्ष रा बालाजीगल्ली उमरी ता. उमरी जि. नांदेड, सागरसिंग उदयसिंग टाक वय २६ वर्ष रा. हनुमानगल्ली उमरी ता. उमरी जि. नांदेड या ०३ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर सहा महीण्याचे कालावधी करीता हद्दपार केले आहे तसे अंतिम आदेश पारीत करण्यात आले आहेत.


नांदेड जिल्हयातील घोकादायक व्यक्तींना स्थानबध्द करण्यासंबंधाने चालु वर्षात २५ प्रस्ताव प्राप्त झाले असुन १२ व्यक्तींना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले आहे. सन २०२४ मध्ये कलम ५५ म. पो. का. अन्वये १३ टोळ्यामधील ४० इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले आहे तसेच कलम ५६ म. पो. का. अन्वये ०२ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर तडीपार करण्यात आले आहे. चालु वर्षात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये २३० प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे.




