धार्मिकनांदेड

Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार

हिमायतनगर, उत्कर्ष मदसवार| हिमायतनगर (वाढोणा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांना समभावाने व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल श्री परमेश्वर मंदिर येथील मंदिर समितीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंदिर प्रशासनाने रांगा व्यवस्थापन, पाणी व फराळ व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त आणि स्वयंसेवकांची नियुक्ती आदी बाबींमध्ये केलेल्या नियोजनामुळे लाखो भाविकांचे दर्शन निर्विघ्न पार पडले. याबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सामाजिक कार्यकर्ते बंटी गुड्डेटवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

यावेळी किशोर स्वामी, डॉ. राजेंद्र वानखेडे, गजानन तुपतेवार, मारोती हेंद्रे यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य व अनेक भाविक उपस्थित होते.
महाशिवरात्रीसारख्या मोठ्या धार्मिक उत्सवात केलेले शिस्तबद्ध नियोजन व सेवाभावामुळे भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत असून, मंदिर समितीच्या कार्याचा सर्व स्तरांतून गौरव केला जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button