नांदेड| दिनांक 29.10.2024 रोजी नांदेड पोलीस दलाकरीता आगामी काळातील अतिमहत्वाचे निवडणुक बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तकरीता नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समिती कडुन वाहने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने घटकाकरीता 39 नविन वाहने खरेदी करण्यात आले आहेत.


सदर 39 वाहनात 22 निओ बोलेरो, 15 स्कॉर्पिओ व 02 महिद्रा थार खरेदी करण्यात आले. सदर वाहने खरेदी करण्याकरीता अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नांदेड यांनी डिपीडीसी मधुन निधी उपलब्ध करून दिला आहे.


सदर 22 वाहनाचे पोलीस मुख्यालय नांदेड येथे शहाजी उमाप, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र नांदेड, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे हस्ते सदर वाहनांना हिरवा झेंडा दाखवुन पोलीस कर्तव्या करीता रवाना करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन चोपडे, पोलीस निरीक्षक एमटीओ, पोलीस मुख्यालय नांदेड, विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नांदेड यांनी उत्कृष्टरित्या केले.
