Municipal Council Staff Association : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर -NNL

नांदेड| महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यात नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव हरी मोरे (भोकर), जिल्हा सरचिटणीसपदी विठ्ठल रामजी शिंदे (हिमायतनगर) यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा संघटना प्रमुख तथा ज्येष्ठ नेते रामेश्वरजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव जि.सांगली येथे दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आला. सदर मेळाव्यात संघटनेची नांदेड जिल्हा कार्यकारिणी नव्याने घोषित करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्हाध्यक्षपदी साहेबराव हरी मोरे (भोकर), जिल्हा सरचिटणीसपदी विठ्ठल रामजी शिंदे (हिमायतनगर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या मेळाव्यास राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

याप्रसंगी राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष सतिश देशमुख, मुख्य संघटक वैजनाथ स्वामी, सल्लागार सुभाष निरावार, उपाध्यक्ष बालाजी माळचापुरे, सहसचिव जावेदभाई इनामदार, सदस्य बालाजी हरडपकर, गणेश मदने, जिल्हा संघटक सचिन गंगासागरे, जिल्हा सचिव विलास गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष पिराजी जगताप, हरिश्चंद्र वाघमारे, सहसचिव देविदास सिडाम, महिला प्रतिनिधी अर्चना वानखेडे यांनी उपस्थिती होती. नवनिर्वाचित राज्य व जिल्हा कार्यकारिणीस शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button