श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि राजीव गांधी कंप्युटर सायन्स महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३० व १ रोजी आयोजित मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री रेणुकादेवी महाविद्यालय माहूरचा विद्यार्थी पंकज सुभाषराव मुरकुटे यांनी ५००० मीटर रनिंग स्पर्धेमध्ये सिल्वर पदक प्राप्त केले १५०० मीटर रनिंग स्पर्धेत ब्रांच पदक प्राप्त केले.
तर ८०० मीटर रनिंग स्पर्धेमध्ये सिल्वर पदक प्राप्त करून नावलौकिक प्राप्त केला या एकाच विद्यार्थ्यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या रनिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून तीन्ही स्पर्धेत पदक प्राप्त केले असून त्यांनी यापूर्वी देखील अशा विविध प्रकाराच्या अंतरमहाविद्यालयीन आणि खुल्या गटातील मॅराथॉन आणि रनिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून पदकांची कमाई केलेली आहे.
त्याला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. धरमसिंग जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, संस्थेच्या सचिव सौ संध्याताई राठोड, संस्थेचे उपाध्यक्ष किशोर जगत, संस्थेचे संचालक नकुल राठोड, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. टी. एम. गुरनुले तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले