हिमायतनगर l बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष तथा. पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साप्ताहिक वृत्त वारसदार सा. हिमायतनगर क्राईम चे संपादक त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर यांना त्यांच्या सामाजिक ,सांस्कृतिक, पत्रकारिता कार्यातील योगदानाबद्दल त्यांना क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती कामठी जिल्हा नागपूर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार प्रागणात दिनांक 11 जून 2025 रोजी संपन्न झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांकडून त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.


या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक म्हणून दिलीप नेवसे पाटील सातारा कार्यक्रम अध्यक्ष सत्यशोधक शिवदास महाजन सेवानिवृत्त न्यायाधीश पुणे . प्रमुख अतिथी म्हणून शत्रुघन प्रसाद सिंह मंत्री मध्य प्रदेश मुरली मधूझेलम सिने सिंगर हैदराबाद. कवी साहित्यिक नागनाथ डोलारे मुंबई सत्यशोधक रघुनाथ ढोक पुणे शिवकुमार पेटकुले कवी पत्रकार तेलंगणा. अवधेश कुमार ,नंद साहित्यिक प्रवक्ता उत्तर प्रदेश. लोकेश कटारिया ,राष्ट्रीय अध्यक्ष नॅशनल भीम आर्मी. एम सायलू म्हैसेकर, दिलीप राव सामाजिक कार्यकर्ते भोकर . सुरेखा कुरेकर मुंबई सिने बालकलाकार ,कुमारी शिफा पवार भद्रावती.

मी सावित्री बोलते एकपात्री कलाकार गायत्री रामटेके क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समितीचे अध्यक्ष प्रदीप फुलझेले उपाध्यक्ष चक्रधर रामटेके या भव्य दिव्य कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष कवी साहित्य गझलकार मधु बावलकर आदीलाबाद यांच्यासह आदी मान्यवर व समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांना क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार 20 25 सन्मान चिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले भवरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे बहुजन टायगर युवा फोर्स सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा अध्यक्ष भीमशाहीर बापूराव जमदाडे शिराढोणकर पारंपारिक लोकशाहीर कला संवर्धन मंडळ महाराष्ट्र अध्यक्ष शाहीर रमेश नारलेवाड. बहुजन टायगर युवा फोर्सचे जिल्हा सचिव शाहीर शंकर गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष शाहीर किसनराव ठमके अंबाडीकर शाहीर कल्याण डोनेराव.

गोरखनाथ मस्के परमेश्वर वालेगावकर शिवाजीराव डोखळे अविनाश कदम आनंद जळपते. शाहीर सुभाष गुंडेकर पांडुरंग मिराशे विजय वाठोरे नांदेड न्यूज लाईव्ह संपादक अनिल मादसवार, ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड , प्रकाश जैन , पत्रकार सोपान बोंपिलवार ,ज्ञानेश्वर पंदलवाड, मनोज पाटील, दिलीप शिंदे, नागेश शिंदे ,शाहीर विजय परघने, गोविंद गोडसेलवार आदींनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या…
