नवीन नांदेड l पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची त्रिश्त्ताब्दी 300 वी जयंती डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रुग्णालय कर्मचारी एक चांगला उपक्रम म्हणून रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालयात दहा व्हीलचेअर देण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.चव्हाण सर्जन डॉ.अनिल देगावकर डॉ.अभिजीत देवघरे .डॉ. देवसरकर ,आधिसेविका जाधव मॅडम, प्राचार्य बालाजी नगराळे नर्सिंग कॉलेज व्यंकटेश वैद्य नर्सिंग ऑफिसर भूतनर ,साखरे,सखाराम लुटे सांगवीकर ,मस्के सिस्टर ,रुईकर सिस्टर ,चिंतले ,शेळके सिस्टर, आदींनी मिळून सहकार्य केले पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील संघर्षावर प्राध्यापक सरोदे यांचे व्याख्यान झाले व गोविंद गोरे यांनी प्रास्ताविक व आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली .
