नांदेड l अवैध रेती वाहतुकीवर महसूल व पोलिस विभागाने मोठी कारवाई करत तीन हायवा मोठ्या ट्रक वाहने पकडली. ही कारवाई मा. राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड डॉ. सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी, नांदेड व संजय वारकड़ तहसीलदार, नांदेड, श्री बोधनपोड सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


महसूल विभागाच्या पथकाने सदर अवैध वाहने पकडून त्यातील एक वाहन तहसील कार्यालय नांदेड येथे तर उर्वरित दोन वाहने पोलीस स्टेशन लिंबगांव येथे जमा करण्यात आली. पुढील कायदेशीर व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई मंडळ अधिकारी कुनाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, तलाठी संजय खेडकर व राजेंद्र बरोडा , दासरवाड बैईनवाड पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून महसूल व पोलिस विभागाची ही धडक मोहीम पुढील काळातही सुरू राहणार आहे.
