Pm kisan sanman : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता वितरित

नांदेड| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता वाराणसी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात वितरित करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील सुमारे ९.७ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २०,५०० कोटींचा निधी जमा करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील २.२१ लाख शेतकऱ्यांना ४८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला. संपूर्ण राज्यात हा आकडा ४,६०० कोटी रूपयावर पोहोचला. कार्यक्रमात बनौली येथे ₹२,२०० कोटींच्या ५२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करण्यात आला.

सागरोळीत थेट प्रक्षेपण व मार्गदर्शन – या ऐतिहासिक कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण बिलोली तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे करण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. शेतकऱ्यांना यावेळी केंद्र शासनाच्या कृषीविषयक योजनांची माहिती मिळाली आणि त्यांचे समाधान व्यक्त झाले.

फळपिकांवरील विशेष तांत्रिक प्रशिक्षण – कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आंबा आणि लिंबवर्गीय फळपिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. यात आधुनिक लागवड प्रणाली, उत्पादन वाढीचे उपाय, सेंद्रिय शेती पद्धती आणि विपणन साखळी यावर भर देण्यात आला. डॉ संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांनी अत्यंत उपयुक्त माहिती देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी विवेक गुडुप यांच्या हस्ते झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नवीन कृषी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी मंचावर डॉ माधुरी रेवणवार, प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, डॉ कपिल इंगळे, वेंकट शिंदे, नांदेड प्रगतीचे शिवशेटे उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशिक्षणातून लाभ मिळाल्याचे सांगत आपले अनुभवही शेअर केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर ज्ञानवृद्धीची संधी मिळाली. PM-KISAN योजनेच्या लाभांबरोबरच आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. एकंदरीत हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभाचा ठरला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button