HomeनांदेडHealth camp : काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Health camp : काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

नांदेड| मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड  व यशोसाई हॉस्पिटल तसेच काळेश्वर मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने काळेश्वर मंदिर  परिसरात आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये नांदेडचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. ऋतुराज जाधव, अस्थिरोग तज्ञ डॉ. देवेंद्र  पालीवाल, भीषक तज्ञ डॉ. रोहन ढसे, फिजिओथेरपिस्ट डॉ. विजय भारतीया, शल्यचिकित्सक डॉ. सागर कोटलवार व त्यांचा सर्व चमू  होता. तसेच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे उपस्थित होते. 

काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 4 scaled Health camp : काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

यावेळी 206   रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.  प्रारंभी काळेश्वर मंदिर संस्थानचे  सचिव शंकरराव हंबर्डे, कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे, विश्वस्त धारोजी हंबर्डे,बालाजीराव हंबर्डे, सतीश भेंडेकर, गणेश  ढनमने व्यवस्थापक  प्रभू हंबर्डे यांनी मान्यवरांचा सत्कार करून शिबिराची सुरुवात केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशोसाई हॉस्पिटलचे फिरोज पटेल, विशाल काशीदे, गजानन पाठक, आशिष राठोड, माधव देवकांबळे, संदीप घोंगडे आदींनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments