Police Inspector Amol Bhagat : गोवंशाची कत्तल केल्यास दोषींवर कडक कार्यवाही करणार – पोलीस निरीक्षक अमोल भगत

हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र राज्यात प्राणी संरक्षण गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याची काटकोर अंमलबजावणी करण्यासाठी कुणीही गोवंशाची कत्तल आणि कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक, निर्यात करून कायदयाचे उल्लंघन करू नये. या सूचना केवळ उत्सवा पुरत्या नाहीत तर कायमसाठी आहेत. जर कुणी कायद्याचे उल्लंघन करून गोवंशाची कत्तल अथवा अवैध वाहतूक करत असले तर संबंधित व त्यांना सहकार्य करणाऱ्या दोषींवर कडक कार्यवाही केली जाईल असा कडक इशारा पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी दिला.

ते हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक ०३ जून रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीची बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना करताना बोलत होते. यावेळी पुढे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी सांगितले कि, बकरी ईद निमित्त गोवंश जातीचे जनावरे वाहतुक व कत्तलीसाठी विना अन्नपाणी क्रूरतेन बांधून ठेवणे आणि त्यांची कत्तल करून मांस विक्री करणे हा प्रकार प्राणी संरक्षण कायदयाचे उल्लंघन करणारा आहे. अश्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. त्यांच्या सूचनेचे सर्वाना पालन करणे बांधकारक आहे. त्यामुळे कुणीही गोवंश कत्तलीसाठी प्रयत्न करू नये व गोवंशाची वाहतूक करू नये, अश्या सूचना त्यांनी केल्या.

शहरातील समस्येबाबत नागरिकांच्या सुचविलेल्या सूचनांवर बोलताना पोलीस निरीक्षक म्हणाले कि, शाळा, कॉलेज, मंदिर रस्त्यावर टुकार, टारगट मुलांनी टवाळखोऱ्या करू नये, शहरातून भरधाव व वेगात सायलेन्सर काढून फटका वाजवत बुलेट, दुचाकी वाहने चालवू नये, महिला मुलींना त्रास होईल असे वाहने चालवू नये असा प्रकार लक्षात अल्यास किंवा कुणाची तक्रार आल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही होईल. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. शहरात अगोदरच अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी होते आहे. यात भरधाव वेगातील वाहने अपघाताला निमंत्रण देणारी आहेत. यावर नगरपंचायतीने लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमण होणार नाही अश्या सूचना केल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला महावीरसेठ श्रीश्रीमाळ, राजवर्धन श्रीश्रीमाळ, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, किशोर रायेवार, विलास वानखेडे, विठ्ठल ठाकरे, रामभाऊ सूर्यवंशी, गजानन हरडफकर, रामू नरवाडे, बाळू अण्णा चवरे, गजानन तुपतेवार, समद खान, आश्रफ भाई, फेरोज खान, संजय माने, बाखी सेठ, सरदार खान, शंकर पाटील, फेरोज कुरेशी, जावेद खतीब, मनान भाई, शेख अफरोज, निकू ठाकूर, शुभम गाजेवार, मंगेश धुमाळे, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, दुर्गेश मंडोजवार, आदींसह शहरातील शेकडो हिंदू मुस्लिम बांधव व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस ठाण्यात शुद्ध पाणी फिल्टर बसविण्याची राजवर्धन श्रीश्रीमाळ यांनी केली घोषणा

हिमायतनगर पोलीस ठाण्यात व दक्षिण मुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक नागरिकांची तहान भागविण्यासाठी शुद्ध आणि थंड पेय जल उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड येथील पुष्पा ज्वेलर्सचे मालक राजवर्धन श्रीश्रीमाळ यांनी पोलीस ठाण्यात शुद्ध पाणी फिल्टर बसविणार आसल्याची घोषणा केली. त्यांच्या या दातृवत्वाबद्दल पोलीस निरीक्षक अमोल भगत व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अनेकांनी त्यांच्या दानशूरतेबद्दल अभिनंदन केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button