HomeनांदेडOrange and Yellow Alerts : आँरेज व यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व...

Orange and Yellow Alerts : आँरेज व यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर| भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांना आँरेज अलर्ट तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री महोदय यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पूर परिस्थितीचा आढावा घेतला व झालेल्या नुकसानीचे योग्य प्रकारे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा, पर्यटन स्थळे, धबधबे व गर्दीची ठिकाणे येथे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी व आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, जिल्हाधिकारी यांनी स्थानिक संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी शाळांना सुट्टी संदर्भातील निर्णय घ्यावा, स्थलांतरित नागरिकांच्या निवारा केंद्रांमध्ये योग्य सोयी-सुविधा, अन्न व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. नागरिकांनी नदी, नाले, बंधारे, धरण परिसरात जाणे टाळावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागात आज रोजी ३२.३० मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली असून, विभागातील ५७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.तसेच दि.१४.०८.२०२५ पुन १८.०८.२०२५ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्यांकडून प्राप्त प्राथमिक माहिती नुसार विभागातील एकूण १००४ गावे बाधित झालेली असून ०१ व्यक्ती जखमी तर ०६ व्यक्ती मयत (हिंगोली-०१,नांदेड-०३,बीड-०२) झालेल्या आहे.तर एकूण २०५ जनावरे मयत(दुधाळ मोठी-६९,दुधाळ लहान-१०२,ओढकाम करणारी मोठी-२८, ओढकाम करणारी लहान-०६) झालेली आहे.तर अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या एकूण – ४८६ आहे.शेती पिक नुकसानीच्या प्राथमिक माहिती अहवालानुसार एकूण ३,२९,५०९ शेतकरी बाधित झाले असून २,८०,८६१.०२ हे.आर क्षेत्राचे (जिरायत-२७२५०७.०२,बागायत-८१५८,फळपिक-१९६ हे.आर) नुकसान झाले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments